✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि .5 जानेवारी) : – दिवसेंदिवस सापांच्या घटनांमध्ये वाढ होत असून बरेच लोकांचा अश्या घटनामध्ये मृत्यू होतो, या गोष्टीची गांभीर्याने बाब लक्षात घेऊन दिव्यांश नवचैतन्य बहुउद्देशीय संस्था गडचिरोली चे अध्यक्ष श्रीकृष्ण अर्जुनकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष अमोल कुळमेथे यांनी गडचिरोली येथील सर्पमित्रांना साप पकडण्याचे स्टिक्स चे वितरण केले.
विशेषत पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये सपांचा शिरकाव मानवी वस्ती मध्ये जास्त प्रमाणात होत असल्यामुळे अश्या घटनांना समोर जावा लागतो, जेणेकरून लोकांचा जीव वाचवण्यात कुठलाही अडथळा सर्पमित्रांना होणार नाही या करिता त्यांना साप पकडण्याच्या स्टिक्स चे वितरण करण्यात आले, यावेळी सर्पमित्र अजय कुकडकर, सौरभ सातपुते, चेतन थोरात, अनिकेत उरकुडे, योगेश हजारे, करण मंगर, अनुप मशाखेत्री सह अन्य सर्पमित्र उपस्थित होते.







