✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.2 जानेवारी) :-
गडचिरोली(दि.2 जानेवारी) :- लोकमत संखी मंचच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांचे स्वागत व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी नगराध्यक्षांच्या हस्ते केक कापून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी लोकमत संखी मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांना नगरविकासासाठी यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्ष निंबोरकर यांनी आपल्या मनोगतात लोकमत संखी मंचचे आभार मानत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला लोकमत संखी मंचचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात पार पडला.







