अंकुश मोगरकर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळांमध्ये नोटबुक वितरण

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.2 जानेवारी) :- 

नवीन वर्षाच्या निमित्ताने अंकुश मोगरकर यांच्या पुढाकारातून धानोरा तालुक्यातील कणगडी, मरकेगाव, वडगाव व किसनेली येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करण्यात आले. नवीन वर्षाची सुरुवात नवीन उमेदीने या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापिका गेडाम मॅडम, आलाम मॅडम, कुमरे मॅडम व आत्राम मॅडम उपस्थित होत्या. यावेळी शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.