महिला पतंजली योग समितीतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. गीताताई लिंगायत यांचा सत्कार

✒️गुणवंता चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.1 जानेवारी) :- 

      महिला पतंजली योग समिती, चिमूर यांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा गीताताई लिंगायत यांचा सत्कार समारंभ आज बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी जगन्नाथ बाबा मठाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

        या प्रसंगी महिला पतंजली योग समितीच्या वतीने हवन, भजन तसेच अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा हरणे या होत्या. प्रमुख पाहुण्या व सत्कारमूर्ती गीताताई लिंगायत यांनी आपल्या मनोगतात, महिला सक्षमीकरण व चिमूरच्या सर्वांगीण विकासासाठी महिला पतंजली योग समितीतील महिलांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितू पोहनकर यांनी केले, तर सौ. निता कुरडकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महिला पतंजली योग समितीच्या योगप्रेमी साधिका, कर्मठ कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सरत्या वर्षाला निरोप देत व नवीन वर्षाचे स्वागत करत कार्यक्रम अत्यंत खेडसाळ व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.