✒️महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि .1 जानेवारी) :-
नवीन वर्ष गडचिरोली शहरासाठी प्रगती, समृद्धी आणि सर्वांगीण विकासाचे नवे पर्व घेऊन येवो, अशा सदिच्छा गडचिरोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी शहरवासीयांना दिल्या. नववर्षाच्या प्रारंभानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा देताना गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या.
*नगराध्यक्ष निंबोरकर म्हणाल्या की, “गडचिरोली शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार आणि नागरिकांच्या जीवनमान उंचावणारा असावा. नवीन वर्षात शहराच्या विकासासाठी नव्या योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि नागरिकांच्या सहकार्याने गडचिरोलीला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा संकल्प करण्यात येईल.”
त्यांनी गडचिरोलीतील तरुण, महिला, व्यापारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी शहराच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. तसेच नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश आणि समाधान घेऊन येवो, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांच्या शुभेच्छांमुळे गडचिरोली शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, विकासाच्या नव्या वाटचालीसाठी आशावाद व्यक्त केला जात आहे.







