मंडळ अधिकारी राम पंडित यांना पदोन्नती

🔹उमरखेड येथे (सं.गा.यो.) नायब तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेतली

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.9 डिसेंबर) :- 

महागावचे भूमिपुत्र राम अनंतराव पंडित मंडळ अधिकारी महागाव यांची शासनाने पदोन्नती केली. त्यांची पदस्थापना उमरखेड तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार पदाची आज सूत्रे हाती घेतली. नायब तहसीलदार पंडित यांचे उमरखेड तहसील कार्यालयामध्ये एका छोटे कानी कार्यक्रमातून सत्कार करण्यात आला. 

  या वेळी तहसीलदार राजेश सुरडकर,नायब तहसीलदार राणे तसेच मंडळाधिकारी नागपूर जिल्हा शाखा यवतमाळचे अध्यक्ष गजानन सुरोशे यांनी नवनिर्वाचित नायब तहसीलदार राम पंडित यांचा सत्कार केला.राम पंडित यांनी आपल्या सेवेची सुरुवात जुन १९९४ ला तलाठी म्हणून पांढरकवडा (केळापुर) येथे रजु होऊन केली. त्या नंतर त्यांची पदोन्नती मंडळ अधिकारी म्हणून जुलै २०११ ला वणी येथे झाली. उमरखेड तहसील कार्यालयात नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) पदी ९ डिसेंबर रोजी रुजू झाले. राम पंडित यांच्या नियुक्तीने उमरखेड शहरासह तालुक्यांतील गरजू वृद्ध लाभार्थ्यांना वर्धापकाळ योजनेचा लाभ देण्यासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली निघून अनेकांना या विभागातून लाभ मिळणार आहे.