पुसद पोलिसांकडे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल

🔹आता महागाव,उमरखेड, पुसद परिसरातील चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.9 डिसेंबर) :- 

पुसद पोलिसांकडे मोबाईल फॉरेन्सिक तपासणी व्हॅन दाखल झाल्याने महागाव, उमरखेड, पुसद तसेच दराटी, बिटरगांव,पोफाळी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाढलेल्या चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला आता गती मिळणार आहे. महागाव पोलीस स्टेशनमध्ये अनेक चोरीचे गुन्हे प्रलंबित असतांना ही व्हॅन कॉल डिटेल विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि तांत्रिक पुरावे मिळविण्या साठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.

   या व्हॅनच्या उपलब्धतेमुळे हरवलेली मुले शोधणे,गुन्हेगारांचा माग काढणे आणि पेंडिंग प्रकरणे उकलण्यास मदत होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत पुसद पोलिसांचे आभार मानले आहेत. महागांव तालुक्यांतील भरपूर पेंडिंग असलेले गुन्हे या उपकरणामुळे निकाली निघणार आहेत. यामुळे महागांव परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.