भाड्याच्या घरात सुरू असलेल्या अंगणवाड्यांना हक्काची जागा द्या 

🔹अंगणवाडी सेविका मदतनीसांची नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्याकडे मागणी

🔸दोन महिन्यात सर्व अंगणवाड्यांचा कायापालट करू नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे प्रतिपादन

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.9 डिसेंबर) :- 

माहूर शहरातील एकात्मिक बाल विकास सेवा नागरी प्रकल्प क्रमांक 3 नांदेड अंतर्गत सुरू असलेल्या 15 अंगणवाड्याची अवस्था बिकट झाल्याने अंगणवाडी सेविकांनी माहूर नगरपंचायत चे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्याकडे निवेदन देऊन भाड्याच्या घरात सुरू असलेल्य अंगणवाड्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देत सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी दि 8 रोजी भेट घेऊन केली आहे.

माहूर शहरात एकात्मिक बाल विकास सेवा नागरी प्रकल्प तीन अंतर्गत 15 अंगणवाड्यात जवळपास 500 बालक शिक्षण घेत आहेत या सर्व अंगणवाड्या भाड्याच्या घरात असून दोन अंगणवाड्या ग्रामपंचायत काळातील बांधकाम झालेल्या आहेत त्यामुळे त्याही मोडकळीस आलेल्या आहेत त्यामुळे अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविका वरिष्ठ कार्यालय आणि नगरपंचायत कडे या अंगणवाड्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांचे भविष्य धोक्यात आल्याने अंगणवाड्यासाठी नवीन जागा नवीन इमारत आणि सेवा सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी करत आहेत .

वरिष्ठ कार्यालयाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी आणि मुख्याधिकारी विवेक कांदे यांची भेट घेऊन मागण्या सादर केल्या यावेळी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत दोन महिन्याच्या आत जुन्या अंगणवाड्यांची दुरुस्ती आणि नवीन अंगणवाड्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून प्रकरण निकाली काढू असे आश्वासन यावेळी दिले यावेळी अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्ष सत्त्वशीला पंडित वंदना जाधव सुनीता भगत मीना मनवर सुनिता पवार रेणुका पत्की अंजली खडसे सीमा पदमावार शीतल सौंदलकर नबुबाई वानखेडे चित्रा देशपांडे सलमा शेख युसूफ शारदा दूद्दलवार कांता स्वामी सुलोचना कमठेवाड यांचे सह कार्यालय अधीक्षक संदीप गझलवाड लेखापाल विशाल मरेवाड अभियंता रोहित डुकरे विशाल ढोरे स्वाती गुव्हाडे धनंजय कळसकर मझहर शेख विजय शिंदे यांचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.