🔸नगरसेविका जयश्री नरवाडेंचा प्रशासनाल इशारा
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.9 डिसेंबर) :-
महागाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात देशी दारू दुकान किंवा वाईन शॉपी सुरु करण्याला ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ देऊ नये,अशी सोमवारी प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेविका सौ.जयश्री संजय नरवाडे यांनी प्रशासनाकडे निवेदनातून मागणी केली.
महागाव नगरपंचायत प्रभाग क्र. 9 च्या नगरसेविका सौ.जयश्री संजय नरवाडे यांनी महागाव नगरपंचायत प्रशासनाकडे शहरांमधील वसंतराव नाईक चौकात किंवा अन्य ठिकाणी देशी दारू तसेच वाईन शॉपी दुकानाला परवानगी देण्याच्या हालचालीला वेग आल्याने शहरामध्ये कुठल्याही प्रकारे देशी दारू परवाना मिळण्यासाठी नगरपंचायत प्रशासना मार्फत एनओसी देऊ नये, अशी आपली ठाम भूमिका मांडली. या पूर्वी नगरपंचायत महिला पदाधिकाऱ्यांसह नगराध्यक्षांनी देशी दारू दुकानास प्रखर विरोध करीत आंदोलन छेडले. त्या मुळे कुठल्याही परिस्थितीत शहरात दारू दुकानाच्या स्थापनेसाठी अजिबात ‘एनओसी’ देण्यात येऊ नये, अशी सौ.जयश्री नरवाडे यांनी निवेदनातून मागणी केली.
त्यांनी नागरिकांच्या,विशेषत महिलांच्या वतीने,जनहितार्थ ‘दारू दुकानाला परवानगी देऊ नये’ असी कठोर भूमिका घेण्याची विनंती न.प. मुख्याधिकारी यांना 8 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा स्पष्ट इशाराही सौ. जयश्री नरवाडे यांनी दिला आहे. महागाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात देशी,विदेशी दारू विक्री दुकानासाठी परवाना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तेव्हा प्रशासनाने कुठल्याही प्रभागात दारू विक्री परवानगी देऊ नये असा प्रखर विरोध दर्शविला जातो आहे. महागाव नगरपंचायतच्या प्रभाग क्र.1 ते 17 च्या संपूर्ण हद्दीत कोणत्याही ठिकाणी नवीन अथवा जुन्या देशी दारू दुकानाला किंवा वाईनशॉपीला परवानगी देण्यासाठी ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ तात्काळ नाकारण्यात यावे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले, महागाव शहरात दारू दुकाने वाढल्यास शांतता व सुव्यवस्थेचा भंग होईल. आणि युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाईल,ज्या मुळे अनेक गरीब कुटुंबांचे आरोग्य व जीवनमान खालावेल,अशी भूमिका सौ.जयश्री नरवाडे यांनी मांडली आहे.
🔸ते वादग्रस्त दुकान नियोजित ठिकाणी सुरू होण्याचे संकेत
प्रशासनाने सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे न्यायालयाचे आदेश







