✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.8 डिसेंबर) :-
दत्त जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी दत्त शिखर संस्थान येथे पहावयास मिळाली. सभोवतालच्या जिल्ह्यांच्या सह राज्यभरातून भाविकांनी दोन डिसेंबर पासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावत दत्तजन्मोत्सव भक्तीभावात साजरा केला.
दत्तशिखर संस्थानचे महंत परमपूज्य श्री श्री मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभहस्ते दुपारी दोन वाजता अभिषेक समाधी पूजन व जन्म सोहळा विधिवत पार पडला हजारो दत्त भक्तांनी या पावन सोहळ्यास उपस्थिती लावली.
या निमित्ताने गडावर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी विविध सामाजिक संघटना तसेच श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले व तसेच माहूर येथील पंचायत समिती मार्फत गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे माहूर येथील दत्ता चौक टी पॉईंट येथे आयोजन करण्यात आले यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष व्ही. एस. जाधव, ग्रामपंचायत अधिकारी संघटना तालुकाध्यक्ष आरजी सरोदे, सचिव विलास पाईकराव, अमोल टीपरसे अतुल गावंडे, बीबी कासदेकर, अमोल कांडलकर, आशिष चौधरी, जयराम केंद्रे (पंचायत समिती कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष) यांच्या परिश्रमाने महाप्रसादाचे भाविक भक्तांना वाटप करण्यात आले.
महाप्रसाद सुरू करण्याच्या आधी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान टी पॉइंट माहूर येथे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्या हस्ते आरती करण्यात आले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल वाघमारे, काँग्रेसचे वि.जा. भ.ज. चे जिल्हाध्यक्ष किसन राठोड, माजी सभापती उमेश राठोड, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, ज्येष्ठ पत्रकार जयकुमार अडकिने, रफिक गाईड, आरोग्य विभागाचे डॉक्टर रमेश गावंडे, राजकुमार राठोड व पुजारी गजानन समुद्रे या सर्व मान्यवरांना सुरुवातीला शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले. हजारो भक्तांनी महाप्रसादाचे लाभ घेतले.







