🔸८ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.30 सप्टेंबर) :-
विनापरवाना अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर आरसीपी पथक व वनविभागाने धडक कारवाई करुन तब्बल ८ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हे दाखल कार्यवाही 29 सप्टेंबर रोजी काळेगाव परिसरामध्ये करण्यात आली. झालेल्या कार्यवाही मुळे परिसरातील गौण खनिज तस्करामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कार्यवाही झालेल्या आरोपी मध्ये आकाश उत्तम बडगे (वय २८) व मारोती तुकाराम बडगे (वय ५२) दोन्ही रा.काळी दौलत असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. पहिली कार्यवाही आरसीपी पथकाने २७ सप्टेंबर रोजी रात्री केली. सदर पथकाला खबऱ्या मार्फत गोपनीय माहिती मिळाली की, काळी( दौ.) ते साई मार्गावर रात्री ७ वाजताच्या सुमारास निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. २९ बी. पी. ६०१७ अवैधरीत्या रेती वाहतूक करीत आहे. मिळालेल्या माहितीवरून पथकाने धाड टाकून सदर ट्रॅक्टर थांबवुन पाहणी केली. तपासनी दरम्यान आरोपी हे विनापरवाना अवैध रेती वाहतूक करीत असल्याचे मिळुन आले.
पथकाने ट्रॅक्टर व त्या वरील रेती असा मिळून एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रॅक्टर चालक आकाश उत्तम बडगे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८(८) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ही कार्यवाही आरसीपी व काळी पोलीस चौकीतील कर्मचारी उमेश राठोड, रोहीदास राठोड, संदीप पवार, गंगासागर, नितीन आडे, गणेश राठोड आणि विशाल यांच्या पथकाद्वारे पार पडली. तर दुसरी कारवाई सोमवारी २९ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता चिचपाड बिट मध्ये वनविभागाच्या टीम द्वारे करण्यात आली आली.
चिचपाड बिट काळी (दौ.) वर्तुळ, काळी (दौ.) वनपरिक्षेत्र अंतर्गत राखीव वनखंड क्र. ३३७ हद्दीतील वनजमीनीवर अवैधरित्या रेती उत्खनन करुन अवैध वाहतुक करतांना रात्रीच्या वेळी एक ट्रॅक्टर क्र. नसलेला मॉडेल महिंद्रा ५७५ सरपंच मॉडेल रंग लाल वाहतुक करीत असतांना वनअधीकाऱ्यानी राखीव वनमध्ये जप्त केले. या वेळी अधिकाऱ्यांना पाहुन आरोपी मारोती तुकाराम बडगे, (वय अंदाजे ५२ वर्ष) रा. काळी (दौ.) व इतर ४ आरोपी मौक्यावरुन पसार झाले आहेत. आरोपी विरोधात भारतीय वनअधीनियम १९२७ चे विविध कलमा नुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी ट्रॅक्टर ट्राली ३ लाख ७० हजार रुपये व इतर साहित्य ३ हजार असा एकूण ३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही डॉ. बी.एन. स्वामी, उप वनसंरक्षक पुसद वनविभाग पुसद तथा शंशाक कदम, सहाय्यक वनसंरक्षक, जंकास व कॅम्पा, पुसद यांचे मार्गदर्शनात सम्राट मेश्राम, वनपरिक्षेत्र अधीकारी काळी (दौ.), राहुल देशमुख पोलीस उपनिरीक्षक काळी (दौ.) एस.बी.बदुकले वनपाल, ठाकरे, शेख मुखबीर फीरते पथक पुसद, एन.एस. कदम, वनरक्षक, डी. एस. कोळी, ए.डी.राठोड, एस.एच.चिरंगे, गजानन वाडगे, माने पो.कॉ. इंगोले, राठोड चालक वायकुळे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदरच्या दोन धडक कारवायांमुळे अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.







