🔹राजुरा शहरातील सर्व गरबा मंडपात दिली भेट
🔸महाकालीचे रूप ठरले लक्षवेधी
✒️ सौ.सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि .30 सप्टेंबर) :-
संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव सुरू असून प्रत्येक जण नवरात्र उत्सव निमित्त वेगवेगळ्या वेशभूषा, दांडिया स्पर्धा, नृत्यस्पर्धा, गरबा नृत्यात मग्न झालाय. राजुरा शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले रूपेश भाकरे यांच्या सौभाग्यवती रेवती भाकरे ने अष्टमी निमित्याने महाकाली मातेची वेशभूषा धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
शहरातील वेगवेगळ्या गरबा, दांडिया मंडपात , मंदिरात त्यांनी भेट दिली. दरम्यान नागरिकांनीही अतिशय आदरपूर्वक प्रतिसाद देऊन दर्शन घेतले. रेवती भाकरे यांना महाकाली मातेची वेशभूषा साकारण्यात अक्कया मेक ओवर च्या संचालिका कविता कुमार यांनी सहकार्य केले.







