तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे तात्काळ मार्गी लावणार

🔹पालकमंत्री अतुल सावे यांचे पत्रकार परिषदेत आश्वासन 

🔸पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतले श्री दत्तप्रभूंचे दर्शन 

🔹श्री रेणुका माता मंदिराच्या पायरीचे घेतले दर्शन

✒️शेख रफिक माहूर Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.18 एप्रिल) :-

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मा अतुलजी सावे यांनी दि 17 रोजी माहूर गडावर उपस्थिती लावत श्री दत्तप्रभू चे दर्शन घेत महंत 1008 डॉ धनेश्वर उर्फ शाम भारती महाराज यांची भेट घेऊन श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी पायरीचे दर्शन घेऊन शहरातील विश्रामगृहात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत पत्रकार परिषदेत माहूर गडावरील समस्या 829 कोटी रुपयांचा विकास आराखड्यातील कामे तत्काल निकाली काढू असे आश्वासन उपस्थिता समोर दिले यावेळी आमदार भीमराव केराम उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे नियोजित दौऱ्या निमित्त माहूर गडावर आले होते यावेळी आमदार भीमराव केराम यांनी त्यांचे स्वागत केले गडावरील दर्शन झाल्यानंतर त्यांनी श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या लिफ्ट आणि स्काय वॉक च्या कामाची पाहणी करून लिफ्ट आणि स्कायवाकचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे सह कंत्राटदारांना दिल्या .

यावेळी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार तथा व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले यांनी घरकुल घोटाळा शहरासह जंगलात केलेल्या विनापरवानगी झालेली निकृष्ट विकास कामे त्यावर झालेल्या तक्रारी बद्दल माहिती दिली तसेच सामाजिक कार्यकर्ते केशव भगत यांनीही नगरपंचायत बद्दल झालेल्या तक्रारी पत्रव्यवहाराची माहिती दिली वनविभागाची निकृष्ट कामे शिक्षकांची कमतरता वानोळा आरोग्य केंद्राचा विषय यासह पैनगंगा नदीवरील पूल 30 मे पर्यंत चालू करण्यासह इतर उपस्थित करण्यात आलेल्या विषयावर त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना सूचना करत तात्काळ या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश दिले .

त्यानंतर त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या समावेत भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने यांच्या घरी भेट दिली .

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपवनसंरक्षक मनीषा पाटील सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील सहायक उपवनसंरक्षक किरण चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे उपविभागीय अभियंता डि के भिसे तहसीलदार अभिजीत जगताप वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव पोलीस निरीक्षक देविदास चोपडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेश माचेवार वैद्यकीय अधीक्षक डॉ बीबीन बाभळे मराविमचे अभियंता राहुल शेंडे यांचे सह सर्व अधिकारी कर्मचारी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.