कैलास टेकडीवर जाणाऱ्या भाविकांचा ऑटो पलटी

🔹श्री दत्त शिखरच्या घाटातील घातक वळणावर ऑटो पलटी झाल्याने चालकासह आठ भाविक गंभीर जखमी 

✒️शेख रफिक माहुर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.18 एप्रिल) :-

श्री दत्त शिखर संस्थान समोरील पहाडावर अतिउंच टेकड्यावर असलेल्या श्री कैलास टेकडी येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या आटोला श्रीदत्त शिखर श्री दत्त शिखर ते दत्त मांजरी घाटातील तिसऱ्या घातक वळणावर ऑटो चालकाचा ताबा सुटल्याने ऑटो पलटी होऊन चालकासह 8 भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना दि 17 रोजी सकाळी 8.30 वाजता घडली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातल्या येळेगाव तुकाराम येथील सात भाविक ऑटो चालक गजानन नागरे वय 32 वर्ष यांचा ऑटो क्रमांक M H 37 G 4726 या ऑटो द्वारे माहूर गडावरील श्री कैलास टेकडीच्या दर्शनासाठी येत होते श्री दत्त शिखरचा घाट उतरून काळा पाणी तलाव मार्ग श्री कैलास टेकडी जवळ पडत असल्याने घाटातून जात होते तिसऱ्या अतिशय घातक वळणावर ऑटो चालकाचा ताबा सुटल्याने ऑटो पलटी झाला ऑटोत बसलेले अश्विनी दुर्गे वय 32 वर्ष लक्ष्मीबाई काळे वय 42 वर्ष अर्णव दुर्गे वय 9 प्रशांत काळे वय 12 वर्ष मीना काळे वय 35 वर्ष सपना काळे वय 36 वर्ष दत्ता काळे वय 38 वर्ष हे काही भाविक आटोतून बाहेर फेकल्या गेले तर काही ऑटोत दबल्याने गंभीर जखमी होऊन त्यांच्या सर्वांगावर गंभीर जखमा झाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तात्काळ श्री रेणुका देवी संस्थानवर अपघाताची कल्पना दिली श्री रेणुका देवी संस्थानचे अंबुलन्स चालक विनोद जाधव स्वच्छता कर्मचारी वैभव दळवी यांनी तत्परता दाखवून तात्काळ घटनास्थळ गाठून उपस्थि त्यांच्या उपस्थिताच्या मदतीने ॲम्बुलन्स द्वारे सर्व जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले.

येथे वैद्यकीय अधीक्षक बिपिन बाबळे यांचे सह सर्व परिचारिका सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून गंभीर भाविकांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविले घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.