निशांत आंबटकर ची मुंबई लोहमार्ग पोलिस पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार

🔹आदर्श शाळेचा राष्ट्रीय हरित सेनेचा माजी विद्यार्थी

✒️सौ.सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि.18 एप्रिल) :- 

    राजुरा येथील सोमनाथपुर वार्ड येथे राहणारा निशांत संतोष आंबटकर या विद्यार्थ्याची मुंबई लोहमार्ग पोलिस पदावर निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल निशांतच्या घरी जाऊन बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सुवर्णा बेले, राजुरा तालुका महिला संघटिका यांनी शॉल, डायरी पेन व रोपट कुंडी भेट देऊन सत्कार केला. यावेळी निशांतची आई, बहीण, काकू उपस्थित होत्या.

निशांत चे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथे झाले. तर सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा या शाळेत झाले. तो राष्ट्रीय हरित सेनेचा विद्यार्थी असून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात त्याला आवड आहे. सत्र २०२१-२०२२ मध्ये इयत्ता दहावी पास होऊन पुढे पोलिस विभागात सेवा द्यायची इच्छा मनाशी बाळगून निशांत ने पोलिस भरतीचा सराव सुरू ठेवला. यापूर्वी निशांतची अग्निवीर म्हणून भारतीय सैन्य दलात निवड झाली होती. परंतु त्याने अभ्यास व मैदान न सोडता सातत्य ठेवल्याने मुंबई लोहमार्ग पोलिस पदावर निवड झाली. निशांत ची मोठी बहीण मुंबई येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.

तर एक बहीण अतिशय सुंदर अशी रांगोळीकला, व इतर सजावटीचे कामं करते. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला निशांतचे स्वप्न मोठे असून यापुढे देखील तो मैदान व अभ्यास सुरूच ठेवणार आहे असे निशांतचे म्हणणे आहे. त्याच्या निवडीबद्दल बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, तसेच सर्व संचालक मंडळ, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर, आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक दिपक सातपुते आदींनी अभिनंदन केले.