महालगावात कृषी प्रशिक्षणार्थ विद्यार्थ्यांचे आगमन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.2 जून) :-आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे सातव्या सत्राचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक (RAWE) या उपक्रमांतर्गत गावात दाखल झाले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले ,यामध्ये कृषिदूत नयन खोब्रागडे, संदीप जाटवे,अमन कार्लेकर , वैभव काळे आणि ओम जाधव यांचा समावेश आहे. याप्रसंगी गावचे *सरपंच माननीय अभय जामुवंतराव मिलमिले , जि. प. प्राथमिक शाळा शिक्षक वसंतजी राखोंडे इतर गावकरी श्री हरिश्चंद्र बदकी, श्री रवींद्र दुर्गे, श्री आकाश भगत उपस्थित होते.

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पोतदार यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाशी जुळवून घेत शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याचे आवाहन केले. रावे प्रमुख डॉ. आर. व्ही. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत असून कार्यक्रम समन्वयक आर. व्ही. तायडे हे विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे नियोजन करीत आहेत.

त्याअंतर्गत विद्यार्थी गावात 11 हप्ते राहणार असून शेतकऱ्यांकडून शेतीत होणाऱ्या विविध कामांची माहिती जाणून घेणार आहे तसेच त्यांना विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान बीज प्रक्रिया कुक्कुटपालन शेळीपालन पिकांवरील रोग इत्यादी बद्दल प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत. तसेच रावे या उपक्रमांतर्गत गावात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल या कार्यक्रमातून विद्यार्थी आणि शेतकऱ्यांमध्ये माहितीचे आदान-प्रदान होऊन विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान मिळेल व त्यांच्या ज्ञानात नक्कीच वाढ होईल.