भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन

🔸संविधानाने दिलेले मौलिक अधिकार हनन करण्याच्या विरोधात सर्व सामाजिक संघटना रस्त्यावर

✒️यवतमाळ (Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि .19 जानेवारी) :- भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछाडा वर्ग ओबीसी मोर्चा च्या आव्हानावर सोमवार रोजी महात्मा फुले स्मारक आझाद मैदानाच्या समोर यवतमाळ येथे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले, ओडिसा कटक येथे बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे संयुक्त अधिवेशन 26 ते 30 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते व त्याची परवानगी सुद्धा 2महिने अगोदर काढण्यात आली होती, व हे अधिवेशन ओबीसी च्या जातनिहाय जनगणनेला समर्पित करण्यात आले होते, व या अधिवेशनात एससी एसटी ओबीसी व मायनॉरिटीच्या अनेक मुद्द्यांवर विस्तारित चर्चा व जागृती मोठ्या प्रमाणात होणार होती परंतु आरएसएस प्रणित बीजेपी सरकारच्या वतीने ओबीसी समाज जागृत होऊ नये म्हणून तेथील प्रशासनावर दबाव निर्माण करून हे अधिवेशन रद्द केले.

संविधानाने आर्टिकल 14 व 19 नुसार दिलेल्या मौलिक अधिकाराचे शासन व प्रशासनाने उल्लंघन केले, त्यामुळे संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकाराचे मोठ्या प्रमाणात हनन केले यामुळे या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न जनमानसामध्ये निर्माण झालेला आहे. भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पछाडा वर्ग ओबीसी मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून हे पुकारण्यात आलेले चार चरणातील चरणबद्ध आंदोलनाचे दुसरे चरण धरणे आंदोलन यवतमाळ येथे पूर्ण करण्यात आले, भारतात 725 जिल्ह्यामध्ये हे धरणे आंदोलन पूर्ण करण्यात आले असून तिसरे चरण 28 जानेवारी रोजी महा विशाल रॅली काढून पूर्ण करण्यात येणार आहे व चौथे चरण 22 फेब्रुवारीला नागपूर आरएसएस हेडक्वार्टरवर महा विशाल रॅली काढून पूर्ण केले जाणार आहे अशी माहिती या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुनील गवई जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यवतमाळ यांनी दिली, यावेळी राष्ट्रीय पिछाडा वर्ग ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गुलाब कन्नलवार, भारतीय बेरोजगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इन.प्रशांत मुनेश्वर, बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हाध्यक्ष अशोक भोयर, भारतीय बेरोजगार मोर्चाचे प्रदेश प्रवक्ता भुवन मुनेश्वर, बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ- वाशिम लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने,गुरू रविदास क्रांती मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष विजयराज शेगेकर,मराठा सेवा संघा चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, प्रा.पंढरी पाठे, मा.सतीश काळे,यांनी उपस्थित राहून आपले समर्थन जाहीर केले.

यावेळी प्रफुल पाटील,सुनील वेले, देवराव साठे, चंद्रशेखर पाढेन, विलास भोयर, गणपत राऊत ,प्रकाश वावरे, सुखदेव पंचभाई, धनराज चव्हाण, रजा शेख, कुसुम नाईक, सरला मेश्राम, चंद्रकला गवई, सुमन खंडारे, ज्योती श्यामकुवर, कमल भोयर, युवराज आडे, रोशनाताई आडे, येबू खडसे, प्रीती गवई, शहानजर आरसी, राजीव डफाडे, वसंता देवतळे, जानराव पेंदाम,संघपाल खंडेराव, सुरेंद्र परडके, मनोज आत्राम,रामकृष्ण तांबुळे, रुपेश तलपडे, सुखालाल देशपांडे, रंजित कुमरे,विलास भोयर,गुणवंत राडत, मिलिंद बडसे,प्रवीण पिसे,वासुदेवराव शेंडे,निर्मला इंगळे, आशा पाटील, करण खंडारे, प्रवीण उके, विकास जाधव, सुगत नारायणे,प्रतीक भुजाडे,सतीश कांबळे,विपुल चव्हाण,शेख गफार,मोरेश्वर ठोंबरे, मधुकर अलोने, अशोक खोब्रागडे,अशोक मेश्राम,इत्यादी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.