✒️गुणवंत चटपकार चिमूर(Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.19 जानेवारी) :-
दरवर्षीप्रमाणे सकाळ माध्यम समूह तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सकाळ N.I.E. चित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन १८ जानेवारी रोजी महाराष्ट्र व गोवा राज्य स्तरावर करण्यात आले. चिमूर येथील न्यु राष्ट्रीय विद्यालय या केंद्रावर शहर व परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रंगांच्या खेळात रंग भरले.
या स्पर्धेत वर्ग १ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार गट करण्यात आले होते. या केंद्रावर एकूण ५३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये अ गट : १०३, ब गट : १५२, क गट : १७९ आणि ड गट : ९८ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या उपक्रमाला उपजिल्हा रुग्णालय, चिमूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विन अगडे तसेच चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिनेश लबडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्यु राष्ट्रीय विद्यालय चे मुख्याध्यापक सुनिल खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक उज्वल नव्हाते, विज्ञान शिक्षक प्रशांत लढी, तालुका प्रतिनिधी जितेंद्र सहारे, नेरी प्रतिनिधी सुशांत इंदोरकर व त्यांची टीम, राजीव गांधी प्रेरणा कॉन्व्हेंट च्या स्मिता राऊत, अश्विनी कुरेकार, प्रियंका भरोसे, न्युहाली दुरुगकर, श्रुतिका सातपुते, तसेच बागला कॉन्व्हेंट च्या दुर्गा कामडी, साक्षी सेलोकर, नरेश बुटके, प्रितम नागदेवते या शिक्षकवृंदांनी मोलाची भूमिका बजावली. विद्यालयाचे कर्मचारी अमोल येरमे, विलास भजभुजे तसेच सकाळ माध्यम समूहाचे हितचिंतक श्रीहरी सातपुते यांनीही उपक्रमात विशेष सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा सकाळ माध्यमाचा स्तुत्य उपक्रम असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तो नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचे मत डॉ. अश्विन अगडे यांनी व्यक्त केले. तसेच सामाजिक बांधिलकी आणि मुलांच्या विकासासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशा शुभेच्छा पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी दिल्या.







