डोटकुली येथील आमरण उपोषण स्थळाला युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांची भेट

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.14 जानेवारी) :- 

चामोर्शी : दोटकुली येथील ग्रामस्थांनी रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आमरण उपोषण स्थळाला युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे भेट घेत या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला यापूर्वीच लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

श्री. हनाजी कैकाडू शेंन्डे व इतर ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार, दोटकुली येथील श्री. शिवराम नानाजी ढोबे हे संबंधित मार्गावरून जाण्या-येण्यास अडथळे निर्माण करत असून, त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रागाच्या भरात जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या समस्येबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती चामोर्शी, तहसीलदार कार्यालय चामोर्शी, उपविभागीय अधिकारी (एसडीओ) चामोर्शी तसेच जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असा दावा आंदोलक ग्रामस्थांनी केला आहे. “दहा दिवसांची मुदत देऊनही रस्ता मोकळा करून देण्यात आला नाही.

त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नाही,” असे आंदोलकांचे म्हणणे आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाकडे प्रशासन कोणती भूमिका याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष आहे. 

उपस्थिती प्रमोद सहारे,नोमाजी सातपुते, जानकीराम पोरते, गंगा शेडमाके, आशिष घेर, गौरव चौधरी व गावकरी व इत्यादी उपस्थित होते.