पत्रकार दिनानिमित्त काळी (दौ.) येथे पत्रकारांचा सन्मान

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.11 जानेवारी) :- 

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधत काळी दौलत येथे हंसराजभाऊ मित्र मंडळाच्या वतीने पत्रकारांचे सत्काराचा कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय राहुल देशमुख होते. यावेळी वरीष्ठ पत्रकार राम राठोड, ताहा मिर्झा, सुनील डवरे, विकास मोरे, शेख शारीक यांंचा पीएसआय राहुल देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर आत्माराम राठोड यांनी केले. सत्काराला उत्तर देताना पत्रकार बांधवांच्या वतीने राम राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात पीएसआय राहुल देशमुख यांनी पत्रकारांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी बीट जमादार प्रेम आडे, पोलिस कर्मचारी हनुमान गंगासागर, हंसराज मोरे, शाहीर आत्माराम राठोड, अतुल पाटील, बाळू राठोड, राहुल राऊत, शरद काळे, असद खान, रवी पठाडे, बजरंग मोरे, देविदास राठोड, विजय ढगे, सखा पठाडे, तेजस वाघमारे, नितीन वैध, सचिन डवरे, युवराज मोरे, अकील भाई, कृष्णा माहुरे, आदी जण प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद खंडागळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद काळे यांनी केले.