✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.12 जानेवारी) :-
मौजा चित्तेकनार (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथे कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्यांचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून अनिलभाऊ कोठारे हे उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंना क्रीडास्पृहेला प्राधान्य देत खेळावे, संघभावना जपावी तसेच खेळातून शारीरिक व मानसिक विकास साधावा, असे मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.







