✒️राजुरा(Rajura विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.10 जानेवारी) :- निर्वेद बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजुरा यांचे कडून राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील पटांगणात सराव करणाऱ्या ट्रॅक स्टार क्लब राजुरा चे विद्यार्थी ह्यांना पोलीस भरती देणाऱ्या व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरजू व होतकरू विध्यार्थी यांना ग्राउंड वर रनिंग करिता शूज वाटप करण्यात आले व पुस्तके वाटप करण्यात आले.
उपस्थित संस्थाचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री सतिश रमेश सुर, सदस्य श्री आकाश झाडें, नितेश पोटे, राहुल गायकवाड, सुमित कल्लूरवार, निवृत्त शिक्षक श्री. मेश्राम सर आणि ट्रॅक स्टार क्लब, राजुरा चे संचालक व प्रशिक्षक श्री नागेश जाधव सर व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच अध्यक्ष यांनी सर्व देणगी देणाऱ्या देणगीदार यांचे आभार मानून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







