🔸विद्यार्थीसह पालकांनीही सहभागी होत साजरा केला आंदोत्सव
✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.2 जानेवारी) :- भिमा कोरेगाव शौर्यदिन तथा नव वर्ष प्रारंभाचे औचित्य साधून बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर षब्लिक स्कुल, (वडाळा पैकु ) चिमूर येथे १ जानेवारी रोज गुरुवारला दुपारी वार्षीकोत्सवाचे समारोप करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थीसह पालकांनीही आपल्या शालेय जिवनाला उजाळा देत सहभागी होऊन एकप्रकारे कौटुबिंक आनंदोत्सवच साजरा केला.
महापुरुषांचे विचार येणाऱ्या पिढीत रुजवुन त्यांना खऱ्या रूपाने प्रबुद्ध मानव बनविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटी,जालंधर (पंजाब) द्वारा संचालीत चिमूर येथील बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल येथे वार्षीकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यात विद्यार्थी तथा पालकांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमाचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रकाश वानखेडे, प्रमुख अतिथी नवनियुक्त नगराध्यक्षा गिता लिंगायत, नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना वंजारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, गट शिक्षण अधिकारी विशाल बोधाने, विषय तज्ञ संजय पंधरे , प्राचार्य सिद्धार्थ जिलटे इत्यादीसह शाळेचे संचालक मंडळ उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलन तथा महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पन करून करण्यात आली.या प्रसंगी मान्यवरांचे स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यांनंतर मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले तथा ज्या विचाराणे शाळेची निर्मिती करण्यात येऊन पहिल्याच वर्षी वार्षिकोत्सवाच्या सुंदर आयोजना करीता गौरोद्गार काढूण शाळेच्या उत्तरोत्तर यशा करीता शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी व पालकांच्या समुह व एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली.या नृत्यांनी उपस्थितांना खिळवुन ठेवले.सर्व प्रकारच्या स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सिद्धार्थ जिलटे यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका दिप्ती पाटील व शितल डोये यांनी केले.आभार प्रदर्शन शाळेचे उपाध्यक्ष प्रकाश मेश्राम यांनी केले.कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी विद्यार्थी, पालक, संचालक मंडळाचे पदाधिकारी तथा सदस्य आणि हितचिंतकांनी सहकार्य केले.







