भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त कार्यक्रम; आमदार रामदासजी मसराम यांची उपस्थिती

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली(दि.2 जानेवारी) :-

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त देसाईगंज शहरातील हनुमान वार्ड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार श्री. रामदासजी मसराम उपस्थित होते.

यावेळी आयोजकांच्या वतीने आमदार श्री. रामदासजी मसराम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भीमा कोरेगाव येथील शूर जवानांना अभिवादन करून करण्यात आली.

या प्रसंगी धनपाल मिसार सर,नगरसेवक विकास प्रधान,नगरसेविका राधिका पत्रे,राधेयाम पत्रे,अशोक राऊत,नामदेव मेश्राम,सागर वाढई,मृणालि सहारे,स्वप्नील मिसार,सचिन राऊत,हितेश कन्नाके तसेच परिसरातील नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. आयोजन समितीच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.