सांताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त तेली समाजाची भव्य मिरवणूक

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli प्रतिनिधी) 

गडचिरोली(दि.27 डिसेंबर) :- 

सांताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त समस्त तेली समाज, गडचिरोली यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते.

सांताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त तेली समाजाची मिरवणूक दिसत आहे.

लोक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले आहेत—महिलांनी नऊवारी/साडी, पुरुषांनी पांढरा पोशाख व केशरी फेटे/टोपी घातल्या आहेत. केशरी ध्वज, बॅनर, व उत्सवाचे वातावरण स्पष्टपणे जाणवते. 

“संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त तेली समाजाची अभिमानास्पद मिरवणूक – गडचिरोली”

“परंपरा, एकता आणि स्वाभिमान… सांताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा, गडचिरोली”

“समस्त तेली समाजाच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी”.

प्रमुख मान्यवर उपस्थित होते न्यायमूर्ती प्रमोद राव तरारे अध्यक्ष, महाराष्ट्र विक्री कर न्यायाधिकरण, मुंबई युवा व्याख्याते प्रा. तुषार दूधबावरे विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय, कुनघाडा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध गायक राज प्रल्हादराव रायते व संच यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम तेली समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा घेण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के,प्रा. देवानंद कामळी, अ‍ॅड. रामदास कुंघाडकर, बाबुराव कोहडे,रवींद्र निंबोरकर, रमेश कांबळे, गोपीनाथ चांदेवार, विष्णूजी कांबळे,प्रफुल आंबोरकर, भैयाजी सोमनकर, कुणाल भांडेकर, घनश्याम लाकडे,भगवान ठाकरे, रवींद्र ठाकरे, राहुल भांडेकर व सर्व आयोजक यांनी केल होते..