शेख हसिना यांना मृत्युदंडाची शिक्षा का सुनावण्यात आली

      बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्यूनलने माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शेख हसिना यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचे स्वागत केले असून भारताने शेख हसिना यांना बांगलादेशच्या स्वाधीन करावे असे आव्हान केले. दोन वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये जो उठाव झाला त्या उठावानंतर बांगलादेशमध्ये सत्तेवर असलेल्या त्या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांनी भारतात पलायन केले त्या अजूनही भारतातच आश्रयाला आहेत. शेख हसिना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार उसळला शेख हसिना यांच्या समर्थकांनी बांग्लादेशात धुडगूस घातला अजूनही तेथे उग्र निदर्शने होत आहेत मात्र तेथील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे आंदोलकांना दाद देत नाहीत. मोहम्मद युनूस यांनी तेथील प्रसार माध्यमांना शेख हसिना यांची या शिक्षेवरील प्रतिक्रियाही छापण्यास मनाई केली आहे.

मोहम्मद युनूस शेख हसिना यांना लवकरात लवकर मृत्युदंड देण्यावर ठाम आहे पण भारत शेख हसिना यांना बांगलादेशच्या स्वाधीन करेल असे वाटत नाही. शेख हसिना या भारताच्या आश्रित आहे आहे त्यांची सुरक्षा ही भारताची जबाबदारी आहे. शेख हसिना यांना सुनावण्यात आलेली शिक्षा अपेक्षितच होती कारण काही महिन्यापूर्वी भारतीय प्रसार माध्यमांशी बोलताना शेख हसिना यांनी बांग्लादेशात परतण्याची घोषणा केली होती. शेख हसिना यांनी बांग्लादेशात परतण्याची घोषणा केल्यापासून मोहम्मद युनूस हे अस्वस्थ आहेत. पंतप्रधान पदावर असलेल्या शेख हसिना यांना हिंसक निदर्शनांमुळे देश सोडवा लागल्यावर तात्पुरती व्यवस्था म्हणून हंगामी सरकार स्थापन करण्यात आले. या सरकारचे हंगामी प्रमुख म्हणून नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांची नियुकी करण्यात आली.

त्यांची नियुक्ती करण्यात आली त्याचवेळी सांगण्यात आले की सहा महिन्याच्या आत निवडणूका घेऊन लोकनियुक्त सरकार स्थापन करण्यात येईल मात्र दोन वर्ष झाली तरी मोहम्मद युनूस निवडणुकीची घोषणा करत नाही. त्यांना भीती आहे की निवडणूक झाली तर ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. काहीही करून आपली खुर्ची टिकवण्यासाठी ते धडपडत आहेत त्यासाठी ते अमेरिका पाकिस्तान आणि चीनची मदत घेत आहेत. शेख हसिना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनामागे अमेरिका होती हे आता लपून राहिले नाही. अमेरिकेला बांगलादेशातील सेंट मार्टिन हे बंदर हवे आहे. शेख हसिना अमेरिकेस हे बंदर देण्यास उत्सुक नव्हत्या त्यामुळेच अमेरिकेने बांगलादेशातील शेख हसिना यांच्यावर नाराज असलेले नागरिक तसेच कट्टरपंथीयांना हाताशी धरून शेख हसिना यांचे पंधरा वर्षाचे सरकार उधळून लावले.

पाकिस्तान आणि चीनलाही त्या नकोशा होत्या कारण सत्तेवर असताना त्यांचे भारताशी सौहार्दाचे संबंध होते पाकिस्तान आणि चीनला त्या नकोशा होत्या म्हणून त्यांनीही या आंदोलनाला हवा दिली आणि मोहम्मद युनूस नावाचे बाहुले आणून बसवले. हेच मोहम्मद युनूस आज अमेरिका, चीन आणि पाकिस्तान यांच्या नादी लागून भारताला पाण्यात पाहत आहेत. मोहम्मद युनूस जितके दिवस खुर्चीवर राहतील तितका अमेरिका, पाकिस्तान आणि चीनचा फायदा होणार आहे. पुढील काही महिन्यात मोहम्मद युनूस हे सेंट मार्टिन बेट अमेरिकेच्या घशात घालणार आहेत. जर शेख हसिना बांग्लादेशात आल्या आणि निवडणुका झाल्या तर नवीन सरकार आपल्या विचारांचे असेलच असे नाही आणि जर शेख हसीनांचेच सरकार पुन्हा आले तर त्या भारताशीच मैत्री करणार हे चीन आणि पाकिस्तान जाणून आहेत त्यामुळे त्यांनी बांगलादेशात येऊच नये आणि जरी आल्या तरी त्यांना थेट ढगात पाठवून आपले मनसुबे पूर्ण करण्याचा अमेरिका, चीन आणि पाकिस्तान यांचा डाव आहे त्यासाठीच शेख हसिना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

✒️श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे