🔸मोहीनी नाईकांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.21 नोव्हेंबर) :-
राज्यात थंडीचा पारा जसं जसा कमी होत आहे.तसं तसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तापमान वाढत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक ही स्थानिक पातळीच्या तळागळातील कार्यकर्त्यांची निवडणूक आहे.असे पुर्वी बोलले जाएचे मात्र हल्ली च्या काळात सदर निवडणुकीवर कार्यकर्त्यांच्या आशेवर त्यांचेच नेते पाणी फिरवत असल्याचे चित्र सध्या दिसत असुन राज्यात जवळपास डझनभर पेक्षा जास्त ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे मंत्र्याचे तसेच आजी माजी आमदार व खासदारांचे नातेवाईक असल्याचे दिसत असुन या नेत्यांनी कुठे आपल्या पत्नीला, कुठे मुलाला, कुठे सुनबाई ला, कुठे बहीण भाऊला,तर कुठे भाऊजईला अश्या नात्या गोत्यातील सदस्यांना नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरविले आहे.
सदर आशयाचे ज्वंलत उदाहरण म्हणजे ना.इंद्रनिल नाईक यांच्या पत्नी सौ.मोहीनी नाईक या आहेत.सदर निवडणुकीच्या नामांकनाच्या शेवटच्या दिवशी दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सौ.मोहीनी नाईक यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे दाखल केला.सौ.मोहीनी नाईक यांच्या या उमेदवारी मुळे स्थानिक पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आम्ही काय आयुष्यभर फक्त सतरंज्या उचलायच्या का.? असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते श्री.मनोहरराव नाईक यांनी विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष व नगर सेवकाची उमेदवारी देण्याचे वचन दिले होते.परंतु सदर निवडणुकीत कार्यकर्त्यांना दिलेले वचन न पाडता त्यांना वाऱ्यावर सोडले.तसेच आपल्या नवख्या सुनबाईला पक्षाची उमेदवारी देवुन वर्षानुवर्षे त्यांच्या सोबत एकनिष्ठ राहुन काम करणाऱ्या त्यांची मर्जी सांभाळणाऱ्या आणि नगर सेवक व नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वप्ना वर पुन्हा एकदा हरताळ फासला आहे.तेव्हा आपण दिलेले वचन व आश्वासन न पाळण्याची नाईक घराण्याची ही जुनी सवय व परंपरा असल्याचे ही बोलल्या जात आहे.
मंत्री पदा पासुन ते नगराध्यक्ष ही सगळी पदे आपल्याच घरी ठेऊन नाईक घराण्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.त्यांच्या या कृत्यामुळे कार्यकर्तेच नव्हेतर जनतेत ही नाराजीचे वातावरण दिसत असुन या नाराजी चा फटका या नेत्यांना या निवडणुकीत नक्कीच बसणार असुन काही कार्यकर्त्यांनी तर आपली नाराजी समाजमाध्यमांवर ही टाकलेली दिसत आहे.शेवटी या नाराजी चा परिणाम येत्या ३ डिसेंबर ला निकालाच्या दिवशी नक्कीच दिसेल अशी चर्चा मतदारा मध्ये पाहायला मिळत आहे.या शिवाय दि.२१ नोव्हेंबर रोजी फार्म माधार घेण्याच्या दिवशी मनोहर भाऊ आपला मन उदार करुन आपल्या सुनबाई ची उमेदवारी माधार घेऊन एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला उमेदवारी देतील की सुनबाई ची उमेदवारी कायम ठेऊन कार्यकर्त्यांची व जनतेची नाराजी ओढुन घेतील या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.







