✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.21 नोव्हेंबर) :-
मागील काही वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाट हरास झाले नव्हते. त्यामुळे तस्करांनी अवैधरित्या शासनाच्या गौण खनिज संपदेची वाट लावली होती. एवढ्या मध्ये महागाव तालुक्यातील चार रेती घाट झाले आहेत. या मध्ये भोसा,वरोडी, करंजखेड आणि जुनूना या चार रेती घाटांचा समावेश आहे. परंत माहूर कडील भागात पैनगंगा नदीपात्राच्या काठा लगत तस्करामार्फत अवैध रेती साठा जमा केली जात आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रेतीसाठा जमा करण्याची परवानगी दिली का? ऊजागरपणे तस्कराकडून साठेबाजी होतांना दिसत असल्याची सर्रास चर्चा होत आहे. दोन्ही कडून प्रशासनातील अधिकाऱ्याद्वारे कार्यवाही का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वरोडी रेती घाटातील रेती चोरून माहूर तालुक्याच्या नदी काठाने मोठ्या प्रमाणावर रेतीसाठा केला जात आहे. अवैध रेती साठा करण्यासाठी तस्करांसी प्रशासनातील अधिकाऱ्याच्या मुकसंतीने मोठी हिम्मत वाढल्याचे दिसत आहे.
शासनाची गौण खनिज संपदा तस्कराद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे लावून रेती साठा जतन केल्या जात आहे. प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करून तपासणी केली तर या मध्ये बडे तस्कर हाती लागण्याची शक्यता असून या मध्ये कोण कोण रेतीमाफीया रेतीची चोरटी तस्करी करीत आहे हे स्पष्ट होईल. माहूर कडील पैनगंगा नदीपात्रा बाजूने बंधाऱ्याहून जाताना शासनाच्या गुण खनिज संपत्तीची सर्रास लूट होताना जनतेच्या सहज निदर्शनास पडते परंतु माहूर तालुक्यातील महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला शासनाच्या गौण खनिज तस्करीची लय लूट पथना का दिसत नाही? प्रशासनाने नांगी का टाकली हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे खनिकर्म विभाग आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष केंद्रित करत रेती चोरट्यांचा बायबंद व्हावा अशी पर्यावरण प्रेमीतून मागणी पुढे येत आहे.







