जीएसटी दर कपातीचा ऐतिहासिक निर्णय

🔸उद्योग व ग्राहकांकडून स्वागत

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.22 सप्टेंबर) :- 

केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार जीएसटी दर काही रद्द तर काही कमी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थी,शेतकरी, मेडिकल, रुग्णासह गृहिणीला दिलासा मिळणार आहे.वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा लोकाभिमुख निर्णय ठरल्याचे मत जगदीश नरवाडे, अध्यक्ष व्यापारी महासंघ यांनी व्यक्त केले आहे.

  जीएसटी दर कपातीमुळे उत्पादन खर्चात घट होऊन बाजारपेठेत वस्तू स्वस्त होणार आहेत. या मुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेत वाढ होऊन उद्योगांना नवी गती मिळणार आहे, अशी अपेक्षा जगदीश नरवाडे यांनी व्यक्त केली.व्यापारी संघटना, उद्योग क्षेत्र व नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्य व्यक्तीला गृहिणीला रोजच्या वापरातील वस्तू वरील कर रद्द केले. तर काही कमी केल्याने सरकारचे स्वागत करण्यात येत आहे. शौकीन लोकांसाठी सिगारेट, बिडी, तंबाखू, दारू या व्यसनावर 40 टक्के वाढ केल्याने व्यसनापासून मुक्ती मिळेल.आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल.

सरकारच्या या पावलामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि विकासाचा वेग वाढेल,असा विश्वासही जगदीश नरवाडे यांनी नवभारत कडे व्यक्त केला आहे.