✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.22 सप्टेंबर) :-
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ पश्चिम जिल्हा अध्यक्ष डी. के. दामोधर यांच्या प्रमुख उपस्थितीत महागाव शहरातील फुलसांगी रोड स्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रांतीगृहावर 21 सप्टेंबर रोजी तालुका व शहर कार्यकारणी गठित करण्या साठी बैठक घेण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी बैठकीमध्ये चर्चा झाली. निवडणुकीमध्ये बहुजन वंचित आघाडी पूर्ण लढविणार आहे. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी कार्यकर्त्यांमध्ये पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांनी चळवळीमध्ये आपले सक्रिय योगदान देऊन बाळासाहेबाचे हात बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका लढविण्याचा मनोदय व्यक्त केला. नियोजनबद्ध पद्धतीनेया कार्यकर्त्यांनी सामान्याच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी संघटना खंबीरपणे आपल्या पाठीशी असल्याचे यावेळी जिल्हा नेतृत्वाने कार्यकर्त्यांना संबोधित केले. बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, जिल्हा सचिव रामराव कांबळे, जिल्हा सदस्य मंगल खराटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तालुका कार्यकारणी मध्ये काम करू इच्छिणाऱ्या अनेकांचे अर्ज भरून घेण्यात आले. या बैठकीस विजय लहाने,प्रल्हाद नवसागरे, गणेश पाईकराव, कुमार कांबळे, पंजाब सरदार, विलास कांबळे ,पप्पू कावळे, वंदनाताई भवरे, गुणानंद मानकर,दिगंबर चिभडे, नामदेव लहाने यांच्या अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.







