✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.22 सप्टेंबर) :- आज पासून माहुर गडावर शारदीय नवरात्राला सुरुवात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या श्री रेणुका माता मंदिरामध्ये शारदीय नवरात्र महोत्सव निमित्ताने माहूरगडावर लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आई रेणुका मातेच्या दर्शनास येतात व सर्व सह्याद्री भ्रमण करून जातात आई रेणुका मातेचा उदो उदो जय जगदंब गजर करत भक्त दर्शनाचा आनंद घेतात त्यावेळी परतीच्या मार्गाला माहूर पायथ्यालाच लागून असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्रांमध्ये प्रसादाचा
लाभ घेतात यांचाअविरत सेवेचा हे पाचवे वर्ष आहे विश्वस्त व सेवेकरी आणि समस्त अन्नदाते व माहूरवासी सेवेचा लाभ देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ







