🔸महागांव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय येथे झालेल्या नुकसानीचा फॉर्म भरून देण्यासाठी एकत्र यावे…जगदीश भाऊ नरवाडे
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव (दि.4 सप्टेंबर) :- तालुक्यांमध्ये सोळा, सतरा, आणि अठरा ऑगस्ट रोजी अतिवृष्टी सोबतच वादळाच्या तडाख्यात शेतमालासह शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्र्याचा दौरा होऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी पंचनामे वगैरे सोपस्कार पार पडले. जवळपास तीन आठवड्याचा कालावधी उलटला आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे या अतिवृष्टी मध्ये नुकसान झाले आहे. अशांना नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता आधार संघर्ष समितीने पाऊल उचलले आहे.
यासाठी शासनामार्फत नुकसान भरपाई मिळावी या साठी शासनाकडे अर्थ सहाय्य अनुदान मागणी अर्ज भरून पाठविण्याचे ठरले आहेत. अनेकांना अद्याप शासनाकडून अनुदान मिळाले नाहीत. त्यांच्यासाठी शासनाकडून अनुदानाची रक्कम कशी मिळवायची हे आपणांला माहिती आहे. या साठी उद्या दि. 5 सप्टेंबर शुक्रवारी महागाव तालुक्यातील अनुदानाचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये एकत्रित यायचे आहे. या करिता तहसील कार्यालयाच्या प्रांगणातच जनआधार संघर्ष समिती मार्फत विनामूल्य फॉर्म उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तो फॉर्म आपल्या संपूर्ण माहितीसह झालेले नुकसान इत्यादी माहिती भरून अटेस्टेड कॉफी घेणे गरजेचे आहे. कारण अधिकारी, कर्मचारी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचू शकत नाही. तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक प्रत्येकाच्या शेतात, घरापर्यंत पोहोचू शकत नाही.
विशेषता महसूल विभागातील काही कर्मचारी,अधिकारी यांना आर्थिक लाभ होत असेल तर त्यांची पेन आणि पाऊल नुकसानग्रस्ताकडे पंचनामा करण्यासाठी वळते,अशी या वेळी प्रखर टीका जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश भाऊ नरवाडे यांनी माध्यमासी वार्तालाप करतांना स्पष्ट केले. ते पुढे बोलताना म्हणाले, त्या साठी आपलं दुखणं जसं शासन, सरकार आपलंच आहे. जसं माय बाळाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही, त्यामुळे आपणांला अनुदानाचा फॉर्म भरून देणे गरजेचे आहे.
त्या करीता उद्या पाच सप्टेंबर शुक्रवारी तहसील कार्यालयामध्ये आधार संघर्ष समितीद्वारे तयार केलेला फॉर्म भरून शासनाकडे झालेल्या नुकसानी संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी महागाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजुरांनी एकत्रित यावे,असे तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जनआंदोलन आधार संघर्ष समितीतर्फे आव्हान करण्यात आले आहे.







