अतिवृष्टि ग्रस्तांना हेक्टरी पनास हजार रुपए दया

🔸अखिल भारतीय किसान सभेचे शंकर सिड़ाम यांची मोर्चात शासनाकडे मागणी 

✒️शेख रफिक माहुर (Mahur तालुका प्रतिनिधी)

माहूर(दि .4 सप्टेंबर) :- तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना हैराण केले असून हाती येत असलेला घास हिरावून घेतला गेल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये मदत तात्काळ द्यावी अशी मागणीदि ३ सप्तेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय किसान सभा माहूर तालुकाच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देत करन्यात आली आहे 

 माहूर तालूक्यातील शेतकऱ्यांचा आतोनात नुकसान शेतीसह उभी पीके खरडून गेली आहे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गणे हिराहुन घेतला आहे व तसेच प्रशासनाद्वरे लक्ष घालून तात्काळ पंचनामे करूण हेक्टरी पनास हजार रुपए नुकसान भरपाई ध्या व इतर मांगण्यासाठी किसान सभेचे आंदोलन होते त्यावेळी किसान सभेचे शंकर सिडाम (राज्य सहसचिव यांनी मोर्चेला संबोधित करतांना शेतकरी यांचा उत्पादन खर्च दररोज वाड़वला जात आसून मात्र शेती मालाचे भाव सातत्य्याने पड़ले जात आहे शेती मालावरील आयात रद केला आहे त्यामुळे मोठया प्रमाणात कापूस सोयाबीन आयात करून सुदधा देशी शेतकर्योंचे शेती मालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत आसे प्रतिपादन कॉ. शंकर सिड़ाम यांनी केले 

या प्रासंगि राज्य उपाध्यक्ष कॉं. अर्जुन आड़े किशोर पवार यांनी बांधकाम कामगारांना ग्रामसेवका मार्फत ९० दिवस काम केल्ल्याचे प्रमाणपत्र दया शेतकर्यचे संपूर्ण कर्ज माफ़ करा व शेतकर्यंच्या खात्याला बैंकेने लावलेले होल्ड तात्काळ हटवा आशी मागनी निवेदनद्वारे केली नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी शेतकर्यंचे निवेदन स्वीकारले दादाराव गायकवाड़ यानी मोर्चेला पाठींबा देऊंन अपले मनोगत व्यक्त केले किसान सभेचे तालूका पदाधिकारी बाबासाहेब डाकोरे प्रल्हाद चव्हाण राजकुमार पड़लवार श्रावण जादव कादर खान गंगाजी मेश्राम विष्णु आड़े शंकर गंदमवार कालीदास सोनुने दिगांबर आगीरकर वसंत राठोड़ राजू पिसरवाड़ शिलाताई ठाकुर सुनीता वाघमारे गोतम महामुने गोर सेना अर्जुन जाधव विनोद डाकोरे यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते.