🔸चिंचोली जी.प.शाळा शिक्षकांच्या पुढाकारातून जीवनावश्यक वस्तूंच्या किड्सचे वितरण
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव (दि.22 ऑगस्ट) :- शंभुदीप प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. नुकत्याच 16,17 आगस्ट रोजी झालेल्या नैसर्गिक संकटाने जनजीवन विस्कळीत झाले. होत्याचे नव्हते झाले,अनेकांच्या घरातील अन्नधान्याची नासाडी या पूर परिस्थितीमध्ये झाल्याने गोरगरिबांच्या पोटाचीभूक तातडीने भागविण्यासाठी दखल घेत चिंचोलीयेथील जी.प. शाळेच्या शिक्षकांच्या पुढाकारातून गरजूंना किड्सचे वाटप झाले.
नुकत्याच झालेल्या महाप्रलय अतिवृष्टीने महागाव तालुक्यात सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक सेवाभावी संस्थांनी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा विडा उचलला आहे.या मध्ये शंभुदीप प्रतिष्ठान नांदेड द्वारा पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याची किड्स वाटप करण्यात आल्या. चिंचोली येथील बऱ्याच कुटुंबीयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विनोद कांबळे, विकास कपाटे या जोडीच्या पुढाकारातून शंभूदीप प्रतिष्ठानच्या वतीने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किड्स 21 ऑगस्ट रोजी गुरुवारी वाटप करण्यात आल्या.
या किड्समध्ये गहू, तांदूळ, तेल, साखर अशा जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे. या मध्ये चिंचोली येथील अतिशय गरजवंत 17 कुटुंबीयांना ह्या किड्सचे वितरण करण्यात आले. समाजाप्रती आपल्या कर्तव्याची जाण असणारे शंभूदीप प्रतिष्ठान नांदेडचे दीपक कांजाळकर यांनी तातडीने दखल घेत ह्या कुटुंबीयांना छोटीशी मदत म्हणून संसार उपयोगी अन्नधान्याच्या किड्स वाटप केल्या. या प्रसंगी चिंचोली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, फुलसांगवी शाळेचे केंद्रप्रमुख अमोल जाधव, महागाव केंद्राचे केंद्रप्रमुख पुंडलिक पोले, शाळेचे मुख्याध्यापक विनोद कांबळे, सहाय्यक शिक्षक विकास कपाटे यांच्या हस्ते ग्रामस्थांना धान्य किड्सचे वितरण करण्यात आले.







