🔸दिवाणी न्यायालय पुसदचा आदेश ;२०० कोटीची मालमत्ता ३७ कोटीत
✒️विश्वनाथ महामुने (पुसद विभागीय प्रतिनिधी)
पुसद(दि .22 ऑगस्ट) :- येथील कार्ला रोड लगत व बसस्टँड समोरील शेषराव पाटील सहकारी जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या १० एकर जागेची पुढील तारखे पर्यंत विक्री करण्यास विषेश न्यायालयाचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस.वाय. कदम यांनी मंगळवारी स्थगिती दिली आहे.
जिनिंग व प्रेसिंगच्या जागेची खरेदी रद्द करावी, यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजेश साळुंके, अण्णासाहेब ठेंगे, इकबाल अहमदखाँ मिरआलमखाँ, संजय लोंढे यांनी दिवाणी न्यायालयात ७ ऑगस्टला ७२ कोटींचा दावा दाखल केला होता. या संदर्भात सुनावणी पार पडली. न्यायालयाने शेवटचे खरेदीदार
कपिश फायनान्शिअल सव्हिसेस यांना पुढील आदेशापर्यंत कोणालाही जमीन विक्री करू नये,असा आदेश दिला आहे.
सदर जमीन बाजारभावानुसार तब्बल दोनशे कोटी रुपयांची असल्याचे मूल्यांकन आहे. परंतु ही जमीन पस्तीस कोटी एक लाखात आरसी प्लास्टो कंपनीला २१ जुलै २०२२ रोजी विकण्यात आली. आणि फक्त चारच दिवसात ३७ कोटी ६१ लाखांत कपिल फायनान्शिल सर्विसेसकडे पुन्हा दुसऱ्यादां विक्री करण्यात आली.त्यामुळे या प्रकरणात दि.९ जुलै २०२५ रोजी सुनावणी होणार आहे. वादीतर्फे ॲड.अशोक महामुने तर प्रतिवादींकडून,ॲड. महेश निर्मल,ॲड. मनोज घाडगे,ॲड. विवेक देशमुख,ॲड. ए. ए. खान काम पाहत आहेत.







