मोरवाडी शेतशिवारात वाघाचा धुमाकूळ ; शेतकरी भयभीत

🔹वाघाचा जेरबंद करून बंदोबस्त करावा, अन्यथा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन करू ; हंसराज मोरे

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि .22 ऑगस्ट) :- तालुक्यातील काळी (दौ.खा. ) वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणाऱ्या मोरवाडी परिसरातील शेतकरी, शेतमजूर जंगलातील हिंस्रपशुचा वावर असल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाने नुकतेच काल बुधवारी रानडुकराची शिकार केल्याची घटना उघड झाली आहे. यामुळे मोरवाडी परिसरात शेतकरी कमालीचे भयभीत झालेले आहेत. कोणत्याही क्षणी हिंस्रपशु द्वारे हमला होऊन मनुष्यहानी होण्याचे नाकारता येत नाही. त्या मुळे वनविभागाने तातडीने वाघास जेरबंद करावे. या साठी 21 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया द्वारे वनपरिक्षेत्र प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

     काळी (दौ.खा.) परिसरातील मोरवाडी शेतशिवारात काल बुधवारी 20 ऑगस्ट रोजी सुनील मोहन पवार यांच्या शेतात वाघाने जंगली रानडुकरावर हल्ला केला असल्याचे शेतकऱ्यांना आढळून आले. त्या मुळे शेतशिवारात सध्या कामासाठी जाण्यासाठी शेतकरी, शेतमजूरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, वाघाची या भागात दहशत निर्माण झाली. त्या मुळे वन विभागाकडून वाघाने रानडुकराची शिकार केल्याचे स्थळ पाहणी करण्यात आले, परंतु एवढ्याने शेतकऱ्याचे समाधान झाले नाही, वाघांने रानडुकरांवर हमला केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाणे बंद झाले. हिंस्रपशुद्वारे कधीही एखाद्या शेतकऱ्यांवर हमला होऊन जीवित हानी होणे नाकारता येत नाही. यामुळे 21 ऑगस्ट रोजी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय काळी दौलत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर थावरा राठोड, इंदल जाधव, अभय मोरे, शरद काळे, बाबूलाल राठोड, कोंडबा पवार, निलेश पवार, सुनील पवार, हरी जाधव, विकास राठोड, देवानंद अंभोरे, सुभाष पवार, उकंडा राठोड, उज्वल रणवीर आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

(वाघाने हल्ला करून एखाद्याचे प्राण घेतले तर या गंभीर बाबीला जबाबदार कोण ? या मुळे आपल्या स्तरावर वन विभागाकडून तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील वन्य प्राण्यांच्या वाढता प्रभाव पाहता शेतीचे मोठे नुकसान होत आहे. अगोदरच नैसर्गिक संकटकालीन परिस्थितीत शेतकरी कमालीचा हैरान झाला. या संकटातून अद्याप सावरला नसतांना, हे नव्याने वन्य हिस्त्रपशूंची दहशत वाढली आहे. यामुळे वाघाला जेरबंद करून बंदोबस्त करावा अन्यथा आपल्या कार्यालयावर आम्हाला आंदोलन करावे लागेल.) हंसराज मोरे,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया यवतमाळ