🔸 या भागात आत्तापर्यंतच्या हलक्या आणि मध्यम पावसामुळे धरण भरले नव्हते परंतु रात्रीपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे पुसधरण ओव्हरफ्लो, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.16 ऑगस्ट) :-
यावर्षीचा पाऊस आज पर्यंत मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा झाला होता. परंतु शुक्रवारपासून चालू असलेल्या धुवाधार पावसामुळे अधरपूस व अप्परपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राऊ झालेल्या प्रचंड पाऊसामुळे आज सकाळी अप्परपूस प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. सांडव्या वरून सद्यःस्थितीत 27 सेमी एवढा ओव्हरफ्लो सुरू आहे. त्या मुळे अधरपूस प्रकल्पाच्या जलाशयात पाणी साठ्यात वाढत झाल्याने पुस नदी काठावरील गावकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
16 ऑगस्ट रोजी सकाळी 7.00 वाजता 304.88 मी. एव्हढी पाणी पातळी झाली आहे. उपलब्ध पाणीसाठा 44.440 द.ल.घ.मी.आहे.15ऑगस्ट पासून 31ऑगस्ट 2025 या कालावधीत 305.020 मी. एव्हढी पाणीपातळी प्रकल्पाच्या आरओएस नुसार ठेवायची आहे.त्या मुळे सद्यस्थितीत अधरपूस प्रकल्पाचे दोन गेट 25 से.मी.ने उघडलेले आहे. त्या द्वारे 54.00 क्युमेंक्सचा विसर्ग सुरु आहे. अप्परपूस प्रकल्पाचा ओव्हरफ्लो जसाही अधरपूस प्रकल्पात येऊन जशीही 305.020 मी.च्यावर पाणीपातळी जाईल, त्या वेळी जलाशयात येणाऱ्या येव्यानुसार कार्यकारी अभियंता यवतमाळ पाटबंधारे विभाग यवतमाळ यांच्या आदेशा नुसार प्रकल्पातुन नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल.
त्या मुळे पुसनदी काठच्या वेणी (बु.),मोरथ, वाकोडी, सवना, कलगाव, महागाव, जुनूना, करंजखेड, वाघनाथ, थार, कवठा, हिवरा (संगम), धानोडा आणि दहिसावळी या गावातील नागरिकांना सतर्क राहण्या साठी इशारा देण्यात आला. या संदर्भात अविनाश भगत उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग क्र.4 महागाव यांनी कार्यकारी अधिकारी यवतमाळ पाटबंधारे विभाग,उपविभागीय अधिकारी उमरखेड,कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार तसेच महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना माहितीस्तव कळविण्यात आले आहे.







