✒️मूल(Mul विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
मूल(दि.16 ऑगस्ट) :— दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी, शुक्रवार, दिशा फाउंडेशन संचालित माउंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मूल तसेच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, मूल येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिशा फाउंडेशन, चंद्रपूर चे अध्यक्ष श्री. भाऊराव झाडे उपस्थित होते.
विशेष अतिथी म्हणून श्री. प्रसाद निम्बाळकर (कर व प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद, मूल), श्री. महादेव बोंडे (माजी सैनिक) व श्री. सुहास झाडे (उपाध्यक्ष, दिशा फाउंडेशन, चंद्रपूर) व्यासपीठावर उपस्थित होते.
तसेच विशेष निमंत्रित म्हणून सौ. रीमा कांबळे (प्राचार्या, माउंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, मूल), श्री. रोशन गुरनुले (प्राचार्य, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, मूल), श्री. असपाक सय्यद (उपप्राचार्य, माउंट कॉन्व्हेंट, मूल) व श्री. दुश्यंत गणवीर (ज्युनिअर कॉलेज इंचार्ज) यांची उपस्थिती होती.
विद्यार्थी प्रतिनिधी मास्टर वेदांग अनंतुलवार आणि कु. सायली येनूरकर यांनीही व्यासपीठाची शोभा वाढवली. कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक सादरीकरणे, तसेच विद्यार्थ्यांचे भाषणांनी वातावरण भारावून गेले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त आणि एकतेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पलक कोसरे, नमोश्री गजभिये, आरुषी भिमटे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन माही ब्राह्मणवाडे, रुचिका तेलावर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीवर्ग यांनी मेहनत घेतली.







