🔸स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात द्वितीय स्थान पटकाविले
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.3 ऑगस्ट) :- उमरखेड आगाराने घटकांच्या गुनांकन श्रेणीमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे.”स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक” स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शुक्रवार
1ऑगस्ट 2025 रोजी स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियानांतर्गत द्वितीय सर्वेक्षणासाठी अकोला विभागातील विभाग नियंत्रक तसेच अकोला विभाग यंत्रअभियंत्यांच्या टीमद्वारे महागाव बसस्थानकाला सर्वेक्षणाच्या अनुषंगाने भेट दिली.
या वेळी राठोड विभाग नियंत्रक अकोला यांचे तसेच भोपळे यंत्रअभियंता अकोला यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रसंगी उमरखेड आगाराच्या आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मॅडम, लेखाकार पाटील मॅडम, महागाव बसस्थानक प्रमुख बंडू पारवेकर यांची यावेळी उपस्थिती होती. “स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान” संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत उमरखेड आगार सहभागी झाले होते. अभियानाच्या संदर्भाने उमरखेड आगार, बसस्थानक महागाव, तसेच ढाणकी बसस्थानक या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता मोहीम, स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. अभियानाचा एक भाग म्हणून उमरखेड आगारात सौंदर्यीकरण फुलांचा बगीचा तयार करण्यात आला.
महागाव बसस्थानक येथे प्रवाशांना वेगवेगळ्या सवलतीची माहिती व्हावी या हेतूने बॅनर व फ्लेक्स लावण्यात आले. सौंदर्यकरणाच्या दृष्टीने परिसरात फुलांचे रोपटे, वृक्ष लागवड करून विशेष सौंदर्यकरणात भर टाकण्यात आली. मागील सर्वेक्षणामध्ये उमरखेड आगाराने स्वच्छता करून उमरखेड आगाराद्वारे अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळविला. आगार प्रमुखांनी या विजयाचे श्रेय सर्व कर्मचारी वृंदांना दिले आहे.







