🔸तालुकाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर पुरी तर सचिव पदी उत्तम पुरी यांची निवड
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.2 ऑगस्ट) :- दशनाम गोसावी समाज संघटना जिल्हा यवतमाळ संलग्न असणाऱ्या महागाव तालुका कार्यकारणी 1ऑगष्ट रोजी माजी तालुकाध्यक्ष कैलास भारती यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गजानन भारती यांच्या मार्गदर्शनात पुनर्गठन करण्यात आली. या वेळी तालुकाध्यक्ष पदी युवा नेतृत्व ज्ञानेश्वर पुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून आरोग्य विभागाचे जेष्ठ व्यक्तीमत्व उत्तम गिरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी तालुका कार्याध्यक्षपदी सामाजिक चळवळीत प्राधान्याने अग्रेसर असणारे नेतृत्व
रविंद्र भारती (ईजनी) यांची सरचिटणीस पदी निवड झाली. निवृत्त पोलिस काॅंन्स्टेबल संजय भारती (धनोडा) यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. परमानंद भारती (टेंभी), राजेंद्र गिरी (हिवरा) सहसचिव पदी रामेश्वर गिरी,
कोषाध्यक्ष म्हणून सुरज भारती (अनंतवाडी), अवधूत पुरी (राहूर) यांची निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक माजी तालुकाध्यक्ष कैलास भारती, राजु पुरी,कैलास भारती, दिनेश भारती तसेच प्रकाश पुरी यांची निवड करण्यात आली. कार्यकारी सदस्य म्हणून रामगिर गिरी, विजय भारती, गजानन पुरी,अनिल पुरी, राजु पुरी, सदानंद पुरी, समाधान भारती, मुकेश पुरी, आमोल पुरी, रोहीत गिरी, निरंजन भारती यांची तालुका कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.
या वेळी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या आदेशान्वये जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गजानन भारती यांनी महागाव तालुक्यात आपल्या कार्यकर्तुत्वाची विशेष सामाजिक छाप असणा-या समाज बांधवांच्या योग्य नियुक्त्या करूण त्यांना समाजो उपयोगी कार्य करण्याची संधी दिल्याने तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी, समाज बांधवांत नवचैतन्य उभारल्याचे सकारात्मक चित्र पहावयास मिळत आहे.
तालुका कार्यकारिणी च्या निवडी बद्दल यवतमाळ जिल्हा दशनाम गोसावी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरी, कार्याध्यक्ष पवन बन, सचिव दिलीप पुरी, कोषाध्यक्ष योगेश गिरी, उपाध्यक्ष सुहास पुरी, दिपक गिरी,रंजित गिरी तर संघटक दिलीप पुरी, राजु गिरी, सहसचिव निलेश गिरी अविनाश भारती, प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजकमल भारती आदींची जिल्हा कार्यकारिणी मान्यवरांनी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पुरी सह त्यांच्या सर्व टिमचे अभिनंदन करूण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, निवड प्रभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गजानन भारती यांनी तर आभार नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर पुरी यांनी मानले.







