✒️विश्वनाथ महामुने महागांव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव (दि.3 ऑगस्ट) :- देशाच्या स्वातंत्र्य संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आग्रहगणे नेतृत्व विचारवंत ,साहित्यिक , कवी आपल्या लेखणीतून वंचितांच्या व्यथा मांडणारे जगविख्यात प्रबोधनकार, समाज सुधारक , साहित्य भूषण ,समाज भूषण , साहित्य सम्राट ,शिवशाहीर , लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी महागांव शहरात समाज बांधवांच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक महागांव येथे अभिवादन करण्यात करण्यात आले. या वेळी महागाव शहरातून भव्य मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनंदाताई दिलीपराव कोपरकर व मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा सुनंदा दिलीपराव कोपरकर तर प्रमुख पाहुणे संभाजीदादा नरवाडे ज्येष्ठ नेते आपला जिनिंग प्रेसिंग महागांव अध्यक्ष तथा नगरसेवक, महागांव नगरपंचायतचे उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, सामाजिक कार्यक्रते भिमराव भालेराव, माजी नगराध्यक्ष करुणाताई शिरबिरे तर उपस्थीत शैलेश कोपरकर नगरसेवक, देविदास गावंडे संचालक विविध कार्यकारी सहकारी संस्था महागांव, अरविंद गायकवाड, विनायक गायकवाड,सुभाष पतंगे, संतोष वाहुळे,प्रसाद गायकवाड, संजय नागमोते,प्रसाद शिंदे,गणेश वाहुळे,गजानन सुरोशे,अनिकेत उफाडे,मनोज सुरोशे,अक्षय सुरोशे,प्रतीक गायकवाड ,महागांव शहरातील समाज बांधव प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर अडलोरे यांनी केले तर आभार साहेबराव रणखांब यांनी मानले.







