🔸नुकसान भरपाई द्यावी शेतमालकाची मागणी

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.18 एप्रिल) :- वरोरा तालुक्यातील आबमक्ता येथील शेतमालक सिंधू मारोती पसारे यांची १ एकर मधील ड्रॅगन फ्रुट शेती पूर्णतः अगीने जळून खाक झाल्याची घटना दि. ८ एप्रिल ला दुपारी १२ वाजता घडली.
चौकशी केली असता सदर शेतात एक एकर मध्ये ड्रॅगन फ्रुट चे झाडे असून आग लागल्यामुळे जळून खाक झाले. ही आग विद्युत तारेचे शॉर्ट सर्कीट मुळे खांब्या वरील तिडके पडून खाली. असलेल्या गावताला आग लागून ती आग ड्रॅगन फ्रुट च्या शेतापर्यंत पोचून संपूर्ण शेत अगीने घेरून शेत जळून खाक झाली.
शेतमालक त्यांच्या व्यवसायामुळे बाहेर गावी रहात असल्यामुळे गावातील लोकाकडून ८ एप्रिल ला दुपारी १२.०० वाजता शेतीला आग लागल्याचे कळविले. तात्काळ शेतमालकाने जाऊन बघतले असता तोपर्यंत संपूर्ण शेती जळून भस्म झाली होती.
शेतीचा पंचनामा करून ड्रॅगन फ्रुट चे झाडें,ड्रिपचे पाईप, पी व्ही सी पाईप व पिकाला लागणारे अवजारे आगीमुळे जाळल्या मुळे अंदाजे ८ ते १० लाखाचे नुकसान झाले आहे. शेतमालकाने योग्य पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी पोलीस पाटील उपस्थित होते.







