नागरी येथील जगन्नाथ बाबा मंदिरात चोरी, दानपेटी फोडून चोरटे लंपास

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.18 एप्रिल) :- नागरी येथील सद्गुरु जगन्नाथ बाबा मंदिरात चोरटय़ांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील पैसे घेऊन लंपास झाले. रात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी चोरी केली. सकाळी 6 वाजता च्या सुमारास मंदिरात आलेल्या भक्तांना कुलूप तोडून दिसले तर मंदिराच्या बाजूला दानपेटी तोडून पैसे घेऊन चोरटे पसार झाले. जवळपास 50 हजाराच्या आसपास रक्कम दानपेटी मध्ये असल्याचा अंदाज आहे. रामनवमी व 16 तारखेला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात दान पेटी मध्ये भक्त दान टाकतात.

चोरटय़ांनी मात्र जगन्नाथ बाबा यांच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट मात्र चोरला नाही. त्यामुळे चोर हे आसपासच्या परिसरात आहे असा अंदाज आहे. ठाणेदार साहेब यांनी स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केली व पोलिसानी तातडीने तपास सुरू केला आहे काही संशयी असून पोलिस तपास करीत आहेत लवकरच चोरटय़ांच्या मुसक्या आवरणात येणार. सकाळी ही बातमी कळताच भाविकांची गर्दी मंदिर परिसरात जमा झाली होती.