उखर्डां येथे जागतिक माती दिवस साजरा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन ..

🔸पर्यावरणासाठी व निसर्गचक्रासाठी मातीचा ऱ्यास होणे खूप मोठा धोका:– अभिजीत कुडे

✒️वरोरा(विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)

वरोरा(दि.9डिसेंबर)::– तालुक्यातील उखर्डां येथे जागतिक माती दिवस साजरा करण्यात आला. अंबुजा सिमेंट फाउंडेशन, नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना, न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अंबुजा सिमेंट फाउंडेशन अधिकारी रुपाली ढाले व निता वैद्य यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.मृदा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. म्हणूनच लोकांना मातीचे महत्त्व सांगण्यासाठी, मातीच्या गुणवत्तेची जाणीव आणि मातीच्या संवर्धनाची जाणीव करून देण्यासाठी अश्या प्रकारचे मार्गदर्शन आवश्यक आहे.

मृदा संवर्धन आणि शाश्वतेकडे व्यवस्थापनाचे लक्ष जावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीमुळे दिवसेंदिवस मातीवर दुष्परिणाम होत चालले आहे. त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष अभिजित प्रभाकरराव कुडे यांनी केलं.मातीच्या गुणवत्तेची जाणीव आणि मातीच्या संवर्धनाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन (World Soil Day) साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था आज जागतिक मृदा दिन साजरा करतात. शेतकऱ्यांनी माती परीक्षण प्रक्रिया करावी व त्या नंतर योग्य ते घटक च जमिनीत पुरेसा प्रमाणात द्यावे या साठी अंबुजा सिमेंट फाउंडेशन प्रयत्नशील असल्याचे रुपाली ढाले यांनी सांगितले. माती वाचली तर माणसं वाचेल म्हणून बिघडलेल्या मातीच्या स्थितीबद्दल जागरूक करणे . त्याचबरोबर लोकांनी मातीच्या संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.. यावेळी उपसरपंच प्रमोद फरकाडे ,नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना सचिव शुभम हीवरकर, न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था सचिव रोशन अंकुशराव भोयर. सुरेश डोमकावडे, दीपक कुडे, तेजस उरकुडे, रवींद कुडे, देवराव मडावी, ईश्वर पुसदेकर , वैभव पुसदेकर, ऋषिकेश कुडे, विकास उसरे, सूरज हीवरकर, गजानन देवतळे व शेतकरी उपस्थित होते..