शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बोडखा येथील शालेय विद्यार्थीना छत्री वाटप Shiv Sena Uddhavsaheb Balasaheb Thackeray distributed umbrellas to school students in Bodkha on behalf of the party

69

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.2 ऑगस्ट) :-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात त्यामुळे त्यांना वरोरा बस स्टॅन्ड वरून शाळे पर्यंत विद्यार्थीना पायदळ जावं लागते कारण सध्या पावसाचा मौसम सुरु आहे.

 पावसापासून बचाव करण्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सामाजिक उपक्रम राबविणे सुरु आहे.

 त्यामुळे शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांनी बोडखा मोकाशी येथील विद्यार्थीना एक छोटी सी मदत म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या सहकार्याने शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांनी प्रत्येक शालेय विद्यार्थीना छत्र्या वाटप करण्यात आल्या.

 त्यावेळी बोडखा येथील शालेय विद्यार्थी यांनी शिवसेना पक्षाचे आभार व्यक्त करुन आनंद व्यक्त केला.गणेश चिडे यांनी काही दिवसापूर्वी शालेय विद्यार्थीसाठी बस सेवा सुरु करुन दिली.

  सामाजिक उपक्रम राबऊन 80% समाजकारण व 20% राजकारण हे शिवसेनेची विचारधारा नेहमी आम्ही कार्यरत ठेऊ असे व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी व्यक्त केले.