बहिणीच्या हत्या प्रकरणात भावाला एक दिवसांची पोलीस कोठडी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.30 मार्च) :- संशयावरून बहिणीला काठीने डोक्यावर जब्बर मारहाण करून सख्या भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना तालुक्यातील शेणगाव येथे २७ मार्च रोजी घडली.याप्रकरणात अटक असलेल्या आरोपी भाऊ रमेश कावरे यांना जिवती पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

           रमेश कावरे व मृत्यक सुजाता कावरे हे बहिण भाऊ मागिल तिन वर्षांपासून शेणगाव येथील भाऊजी रमेश परवतम व बहिण रंजीता परवतम यांच्या कडे राहत होते.दरम्यान २४ मार्च रोजी सिरोंचा येथे राहणारी मावश बहिण पाहूणचारीला रंजीता परवतम यांच्या घरी आली होती.त्यावेळी बहिण भाऊजी सह रमेश कावरे व मृत्यक बहिण सुजाता व रमेश कावरे चा मित्र चंदन घरी होता.भोपाळ येथे मिटींग असल्याने भाऊजी रमेश परवतम व बहिण रंजीता परवतम हे आपल्या मुलांसह रात्री ९ वाजता भोपाळ साठी निघून गेले होते.२७ मार्चला दुपारी २.०० वाजताच्या दरम्यान रमेश कावरे व मृत्यक बहिण सुजाता संशयावरून वाद उफाळून आला या वादातून बहिणीला काठीने डोक्यावर जब्बर मारहाण केली होती.

तिला उपचारासाठी चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डोक्यावर जब्बर मारहाण झाल्याने २७ मार्च ला रात्रो ११.३० च्या दरम्यान तिचा मृत्यू झाल्याने पाहूनी म्हणून आलेल्या बहिणीच्या बयाणावरून या प्रकरणाची सत्यता समोर आली होती त्यानुसार आरोपी भाऊ रमेश कावरे यांच्यावर गुन्हा दाखल करून जिवती पोलीसांनी ताब्यात घेतले होते शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.