गाडगे बाबांचा आदर्श सर्वांसाठी लाभ दायक

167

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.24 डिसेंबर): – स्वच्छतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत वैराग्य मुर्ती गाडगे बाबा यांचा आदर्श सर्वांसाठी लाभदायक असून त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे …असे मत वैद्यकीय अधिकारी श्री अंकुश राठोड यांनी या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले .

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला मा . डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक,सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका सौ कुमरे, श्रीमती कोडापे,सौ मोगरे, इत्यादी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.डाॅ राठोड वैद्यकीय अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले,सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी स्वच्छेतेचा संदेश आणि अंधश्रद्धा गाडगे महाराजांच्या जिवनचरीत्रा विषयी माहिती दिली.उपजिल्हा रुग्णालयातील सर्वांनी स्वच्छता संदेश दिला.