धक्कादायक.  १९ वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार  Shocking.  A 19-year-old tribal girl was assaulted

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.25 जुलै) :- मागिल दीड महिन्यांपासून मणिपूर राज्यात आदिवासी समाजातील महीलाची विवस्त्र करून धिंड काढून सामूहिक बलात्कार करून मारल्या गेल्याची पडसाद सर्वत्र भारतात व जगभरात त्यांची तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अशातच आदिवासी बहुल भाग असलेल्या जिवती तालुक्यातील आबेझरी गावातील १९ वर्षीय आदिवासी मतीमंद मुलींवर अतिप्रसंग करण्यात आला. सदर नराधमाचे नाव शपरूद्दिन शेख वय ४५ असून अंबेझरी येथिल रहिवासी आहे. पिडीताचे आई- वडील शेतात गेल्याची संधी साधून मतीमंद असलेल्या १९ वर्षीय मुलगी एकटी असल्याची पाहून नराधमाने घरात घुसून त्या मुलींचे हातपाय बांधून तिच्यावर अतिप्रसंग केला आहे.

सदर आरोपीवर भादवी कलम अपराध कं व कलम १५ / २३, कलम ३७६ (१), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एल), ४५० भादवि सहकलम 3(1)(W)(i)(ii), 3 (2) (va) अनुसुचित जाती जमाती अत्याचार संरक्षण अधिनियम गुन्हाची नोंद केली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.

आदिवासी समाजावर दिवसेंदिवस अत्याचारात वाढ होत आहे. १९ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केला आहे त्या आरोपीवर तात्काळ सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशा तीव्र संताप समाजामध्ये व्यक्त केला जात आहे.