अंगणात झोपलेल्या महिलेस वाघाने केले ठार A tiger killed a woman who was sleeping in the yard

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.18 एप्रिल) :- 

             वीरखल चक येथील महिला सोमवारच्या रात्रोला नित्य नियमाने जेवण करून आंगनाथ खाटेवर झोपी गेली असता रात्रोचा सुमारास वाघाने तिच्यावर हल्ला चढवून ठार केले. सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील वीरखल चक येथील मंदाबाई एकनाथ सिडाम (53) ही महिला घरासमोर अंगणात मच्छरदाणी लावून बाजीवर झोपली असता ती झोपेत असताना रात्रो दोनच्या सुमारास वाघाने तिच्यावर हल्ला चढवून फरफडत नेत असताना आरडाओरड झाली.

त्या आवाजाने घरातील व्यक्ती ही त्या आवाजाने आरडाओरड केल्याने वाघाने त्या महिलेला सोडून जंगलात पळ काढला परंतु त्या महिलेच्या घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याने या घटनेची माहिती सावली वन अधिकारी व पाथरी पोलिसांना देण्यातआली असता रात्रीचं घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला असून मृतक महिलेस शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

वन विभागा तर्फे मृताच्या परिवारास 25 हजार मदत करण्यात आली असून 475000 रुपये चेक स्वरूपात देण्यात आले यावेळी वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सावली प्रवीण विरुटकर , कोडपे, पाटील, सूर्यवंशी, वाकडोत, चुधरी, आहिरकर, धनविजय, आदे, शेंडे ,खुडे, तसेच पाथरी पोलिसांचाही उपस्थिती होती घटनास्थळाजवळ ट्रॅप कॅमेरा व पिंजरे लावून वन कर्मचारीयानी ठाण मांडले.

मात्र सदर सावली तालुक्यातील बोरमाळा येथील चार वर्षीय बालकाला वाघाने आंगणातूनच उचलून नेवून ठार केल्याची घटना जेमतेम ताजी असताना त्याचीच पुनरावृत्ती वीरखल चक येथील 53 वर्षीय महिलेस अंगणात झोपून असलेल्या महिलेला वाघाने ठार केल्यानं परिसरातील नागरिकांच्या मनात कमालीची दहशत पसरलेली दिसून येत असुन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे .

वाघाच्या संख्या वाढल्याने आता जंगलातील हिस्त्र प्राणी गावात येऊन मानवाला आपले भक्षण करीत असल्याने वनमंत्री यांनी वाघाच्या बंदोबस्त करण्याकरिता उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.