चंदनखेडा येथे प्रतिभा दीपस्तंभ अभ्यासिकेचे थाटात उद्घाटन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.19 फेब्रुवारी) :- शेगाव येथून जवळ असलेल्या सांसद आदर्श ग्रामपंचायत चंदनखेडा येथील पंचशील बौद्ध मंडळ येथे प्रतिभादीपस्तंभ अभ्यासिका वाचनालय चे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे झाले यावेळी उद्घाटक म्हणून येथील सरपंच नयन बाबाराव जांभुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा .डॉ. एम. एस. वानखेडे , श्री ज्ञानेश्वर रक्षण, श्री .एन .ए. ठमके नागपूर, इत्यादी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री .आर .सुटे मुख्याध्यापक जि. प. प्रा. शाळा श्री .जी .बी. सोनुने, श्री भंतेजी श्री अरुण गाडे, राजुरकर श्री प्रशांत भाऊ काळे ,सामाजिक कार्यकर्ता श्री सुधीर भाऊ मुळेवार प्राध्यापक भीमराव गायकवाड पोलीस पाटील समीर पठाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यानंतर संविधान जागर हे नाटक सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकेश भागवत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच भारतीय शरद उरकांडे यांनी केले कार्यक्रमासाठी पंचशील बौद्ध मंडळ चंदनखेळा पंचशील बद्ध मंडळ विलोडा सर्व ग्रामवासी यांचे विशेष सहकार्य लाभले.